
चिपळुणातील एका सावकाराच्या विरोधात ७ तक्रारी दाखल
चिपळूण येथील एका सावकाराविरोधात सात तक्रारी माहिती आल्या असल्याची सावकारांचे सहाय्यक निबंधक कार्यालयातून देण्यात आली आहे. त्यामुळे त्याची ’लवकरच चौकशी होणार आहे. मात्र ती करण्यापूर्वी संबंधित कर्जदार तक्रारदारांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून येथे सावकारी व्यवसाय चालत आहे. सध्या १३ जणांना सावकारी करण्याचा परवाना आहे. नियमानुसार त्यांनी प्रतिवर्षी १८ टक्के व्याज आकारायचे आहे. मात्र काही सावकार तब्बल ३० टक्के व्याज घेत असून तारण म्हणून रेशनकार्ड, दागिने, दुचाकी ताब्यात ठेवल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
यात पिचलेल्या अनेक कर्जदारांनी आता भाजपची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. यातूनच काही दिवसांपूर्वी कर्जदारांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, तालुकाध्यक्ष विनोद भुरण यांची भेट घेऊन आपली होणारी फसवणूक सांगितली. त्यामुळे या दोघांनी शहरातील परकार कॉम्प्लेक्स येथील सहाय्यक निबंधक कार्यालय गाठून याचा अधिकार्यांना जाब विचारला. त्यामुळे अधिकार्यांनी याची रितसर तक्रार देण्यास सांगितले.
www.konkantoday.com




