
खेड भाजपातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त

खेड : भारतीय जनता पार्टीतर्फे (भाजपा) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिजामाता उद्यानमधील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील स्वच्छता मोहीम राबवून व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व नगरपालिका कर्मचारी यांच्या सहकार्याने परिसर साफ करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने स्वच्छता आणि सुव्यवस्था राखण्याचा संदेश देत अशा उपक्रमांवर विशेष भर देण्यात येत आहे.


या वेळी उपस्थित भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा नगरसेवक तथा गटनेते रहिम सहिबोल, विद्यमान नगरसेविका सौ. वैभवी खेडेकर, नगराध्यक्षा सौ. उर्मिला पाटणे-शेट्ये, नगरसेविका सौ. स्वप्नाली चव्हाण, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, शशांक सिनकर, राजेश जोयसर, शैलेश धारिया, सौ. माया गुहागरकर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, प्रशांत बारटक्के, अनिकेत पवार, विजय गुप्ता, व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच खेड नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.




