खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधात ६ रोजी मोर्चा


खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी व तिच्या पिफास उत्पादनाच्या विरोधात ६एप्रिल रोजी सकाळी१०.३० वाजता कोकण नागरी संघर्षसमिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती व परिसरातील स्थानिक नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
कंपनीच्या पिफाससारखी घातक रसायनांच्या उत्पादनांवर तात्काळ बंदी आणावी. कंपनीतून बाहेर जाणार्‍या सांडपाण्याची स्वतंत्र व पारदर्शक तपासणी करावी. परिसरातील हवा,पाणी व जमिनीच्या प्रदूषणाचा अहवाल जाहीर करावा. पर्यावरणाला व मानवी आरोग्याला धोका निर्माण करणारे प्रकल्प तातडीने बंद करावेत आदी मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button