खासदार नारायणराव राणे यांच्या ७४व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम उत्साहात

भारतीय जनता पार्टी शहर मंडळाच्या वतीने खासदार नारायण राणे यांच्या ७४व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत पार पडला.
या निमित्ताने सिव्हिल हॉस्पिटल येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले तसेच लेप्रसी कॉलनीमधील गरजू कुटुंबांना धान्य वाटप करून समाजातील वंचित घटकांप्रती आपली बांधिलकी व्यक्त करण्यात आली.

दादा ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली शहर मंडळाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जिल्हा सरचिटणीस ओमकार फडके, निलेश आखाडे, संदीप सुर्वे, नंदू चव्हाण, अशोक वाडेकर, राजू भाटलेकर, संतोष सावंत, प्रज्ञा टाकळे, भक्ती दळी, जिरोळे मॅडम, जोशी मॅडम,राजन पटवर्धन, संदीप मांडवकर, शैलू बेर्डे, नितीन गांगण, सायली बेर्डे, अद्वैत कुलकर्णी, तुषार देसाई, सोनाली केसरकर मंदार भोळे, प्रवीणचंद्र हर्डीकर,अमृत गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार नारायणराव राणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी आणि अनुभवी नेतृत्व असून त्यांनी मुख्यमंत्रीपदापासून ते केंद्रातील मंत्रिपदापर्यंत विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. जनसामान्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे आणि विकासकामांना प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
दादा ढेकणे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि शहर मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा वाढदिवसाचा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरला असून, भविष्यातही अशा उपक्रमांची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button