कुरेशी खून प्रकरणातील आरोपी विशाल खोडदेकरवर बलात्काराचा गुन्हा


मुंबई मालाड येथील एहजास हुसेन फैयाज हुसेन कुरेशी यांचा खून करून त्याच्या मृतदेहाची रामपूर-आवटेवाडी जंगल परिसरात विल्हेवाट लावल्याप्रकरणी अटक असलेल्या विशाल खोडदेकर याच्यावर सावर्डे पोलीस ठाण्यात बलात्काराचाही गुन्हा दाखल आहे. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तरुणीची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस गेल्या चार महिन्यांपासून त्याचा शोध घेत होते, अशी माहिती पुढे आली आहे. तर गुरुवारी कुरेशी खून प्रकरणाचा तपास पोलिसांनी संशयितांसह घटनास्थळी जाऊन केला. मृतदेह आणण्यासाठी वापरलेली गाडी जप्त केली.
मुंबई-मालाड येथील एहजासहुसेन फैय्याजहुसेन कुरेशी यांच्या खून प्रकरणात विशाल खोडदेकर आणि त्याची मैत्रीण जन्नतुनिसा जिन्नत खान या दोघांना पोलिसांनी बुधवारी अटक केली होती.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button