कामगाराला लोखंडी शिगेने मारहाण


रत्नागिरी शहरानजिक पावस येथे मोलमजुरी करणारा कामगार जयदास कृष्णा मांडवकर (४५, रा. नालेवठार काम मधलीवाडी, पावस,) आटोपून जात असताना एका दुकान मालकाने लोखंडी शिगेने त्याला मारहाण केली. याप्रकरणी पूर्णगड सागरी सुरक्षा पोलीस ठाण्यात संशयित सौ. शरयू गणेश सुर्वे (४३, रा. रनपार सुर्वेवाडी) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी ८.३० ते ९.१५ सुमारास पावस येथे घडली. फिर्यादी मोलमजुरी करुन पावस जुवीवाडी येथे घरी जात होते. यावेळी शरयु शॉपी या दुकानाचे मालक संशयित शरयु सुर्वे यांनी कोणत्यातरी गोष्टीचा मनात राग धरुन त्यांच्या डोक्यावर कानावर, हातावर, बरगडीवर, पायावर शिगेने मारहाण करुन जखमी केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button