कातळशिल्पांच्या संशोधनाकरिता ’वर्ल्ड हेरिटेज डेस्क’ स्थापन करण्यास मंजुरी, कातळशिल्प संशोधनासाठी ७४ लाख रुपये मंजूर


कोकण किनारपट्टी आणि पठारावर आढळलेली हजारो कातळशिल्पे (जिओग्लिफ्स) हा आद्य मानवाचा वारसा समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. या जागतिक वारशाचे संशोधन आणि जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता मोठे पाऊल उचलले आहे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने कोकणातील कातळशिल्पांच्या संशोधनाकरिता ’वर्ल्ड हेरिटेज डेस्क’ स्थापन करण्यास मंजुरी दिली असून, त्यासाठी ७४ लाख ५ हजार ५६६ रुपयांचा निधी वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र शासनाने ३० मार्च २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे. यापूर्वी १२ फेब्रुवारी २०१६ रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार या डेस्कला तत्वतः मान्यता देण्यात जाली होती त्यानंतर पुरातत्व व वस्तुसग्गृहालय संचालनालयाने या डेस्यासाठी आवश्यक असलेल्या खर्चाचा अस्ताव शासनाकडे सादर केला होता याला आता अंतिम मंजुरी मिळाली आहे. सर्व खर्च २०२५-२६ या आर्थिक वर्षातील मंजूर निधीतून कोण्यात येणार असून, यामुळे कातकशित्यांच्या जागतिक पातळीवरील संशोधनाला मोठी गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button