एलईडी प्रकाशात मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाण्याच्या तयारीत असलेली आणखी एक नौका पकडली


रत्नागिरीतील जयगड समुद्रात सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने एलईडी प्रकाशात मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाण्याच्या तयारीत असलेली आणखी एक नौका पकडली. चार दिवसांपूर्वी याच जयगड समुद्रात एकाच वेळी एलईडी मासेमारी करणाऱ्या तीन नौका याच गस्ती पथकाने पकडल्या होत्या.सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाचे गस्ती पथक शारदा गस्ती नौकेने समुद्रात गस्त घालत होते. परवाना अधिकारी स्मितल कांबळे, सुरक्षा रक्षक सुजल पोवार, अमोल पिलणकर, अनिकेत पवार, भूषण करमरकर गस्ती नौकेने समुद्रात गस्त धालत होते. शनिवारी पहाटेच्या वेळी गस्ती नौका जयगड समुद्रात आली असता राज्याच्या अधिकार क्षेत्रातील म्हणजेच साडेबारा नॉटीकल मैल समुद्र अंतराच्या आत भराडी प्रसन्न नौकेवर एलईडी प्रकाशाची व्यवस्था करून ठेवलेल्या स्थितीत दिसून आली. पाच खलाशांना घेवून ही नौका समुद्रात जाण्याच्या तयारीत असतानाच कारवाई करण्यात आली.

मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने पकडलेली ही नौका मिरकरवाडा बंदरात आणून अटकावून ठेवण्यात आली आहे. नौकेवरील एलईडी लाईट, जनरेटर जप्त करण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button