एम सॅण्ड युनिट उभारणीसाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी महिन्याच्या आत अर्ज करावा


रत्नागिरी, दि. 8 ) : एम सँड उत्पादन करणाऱ्या युनिट धारकाने महाखनिज या संगणक प्रणालीवर यापूर्वी अर्ज केला असल्यास त्यांनी पुन्हा नव्याने जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी अथवा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालये या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
आधुनिक अर्थव्यवस्थेत पायाभूत सुविधांच्या विकासात वाळूची महत्त्वाची भूमिका आहे. या कामांसाठी नदी पात्रातील वाळू प्रामुख्याने वापरण्यात येते. नद्यांच्या पर्यावरणीय समतोलासाठी, नद्यांमधील वाळू सुरक्षित पध्दतीने वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून M-Sand (कृत्रिम वाळू) चा विकास करण्याच्या अनुषंगाने महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन यांनी शासन निर्णय एम. सॅण्ड धोरण जाहीर केले आहे. या कृत्रिम वाळू धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबतची कार्यपध्दती दि. 17 जुलै 2025 व 27 ऑक्टोबर 2025 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये व 27 ऑक्टोबर 2025 रोजीच्या शासन पत्रान्वये निश्चित केलेली आहे.
शासन निर्णय व पत्र, खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये व तहसील कार्यालये येथे अवलोकनासाठी व माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तरी सदर शासन निर्णय व पत्राचे अवलोकन करून एम सॅण्ड युनिट उभारणीसाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्ती व संस्था यांनी या शासन निर्णय व पत्रात नमूद कागद पत्रासह परिपूर्ण अर्ज जाहिरात प्रसिद्ध दिनांक पासून 1 महिन्याच्या आत खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे सादर करणे बंधनकारक आहे. अर्जासोबत खालीलप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
मिळकतीचा चालू 7/12 उतारा, वैयक्तिक अर्ज असल्यास अर्जदार यांचे आधारकार्ड व पॅनकार्ड, संस्थेचा अर्ज असल्यास संस्थेबाबतची कागदपत्रे, रुपये 500/- इतकी अर्ज फी, एम सँड युनिट ज्या ठिकाणी स्थापन करावयाचे आहे त्याकरिता MPCB कडून प्राप्त CTE, युनिटमधून 100% एम सँड उत्पादित करण्याबाबतचे रु. 100/- च्या स्टॅम्प पेपरवरील हमीपत्र,एम सँड उत्पादित करण्यासाठी दगड कोणत्या खाणपट्ट्यातून व इतर स्रोतांतून (Source) आणण्यात येणार आहेत, त्या खाणपट्ट्याचा अथवा स्रोताचा तपशील, उद्यम आधार प्रमाणपत्र .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button