एक वर्षात तब्बल 30 हरवलेल्या मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडे सुखरूप पोहोचवण्याचीरेल्वे सुरक्षा बलाच्या विभागाची कामगिरी


कोकण रेल्वेच्या मार्गावर कार्यरत असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी गेल्या वर्षभरात चमकदार कामगिरी करताना प्रवासादरम्यान रेल्वेमध्ये विसरलेले तब्बल 53 लाख 6 हजार रुपयांचे सामान प्रवाशांना परत केले आहे.तसेच तब्बल 30 हरवलेल्या मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडे सुखरूप पोहोचवण्याची कामगिरीही पार पाडली आहे.

कोकण रेल्वेच्या मार्गावर दिवसभरात तीस हून अधिक ट्रेन धावतात. या ट्रेन मधील प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते ती रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांवरती, मार्गावर चोवीस तास धावणाऱ्या गाड्यांमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर रेल्वे सुरक्षा बलाचे जवान गस्त घालतात आणि लोकांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी उचलतात. कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या ट्रेन मध्ये अनेक वेळा प्रवासी उतरताना आपले सामान विसरून जातात. गेल्या वर्षभरात कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागात अशा 141घटना समोर आल्या आहेत. या सगळ्या घटनांमधून कोकण रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने तब्बल 53लाख 6हजार776 रुपयांचे सामान, मौल्यवन वस्तू प्रवाश्यांना परत मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button