
इंधन तुटवट्यामुळे चिपळुणात गरिबांचा वडापाव ही महागला
अमेरिका, इस्त्रायल, इराण युद्धाचा परिणाम म्हणून तेलाचे भरमसाठ वाढलेले दर, तसेच इंधनाचा निर्माण झालेला तुटवडा याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसत आहे. यात विशेष म्हणजे तेल आणि इंधन या कारणास्तव येथील व्यावसायिकांनी गरीबांचा आधार मानला जाणारा वडापावचा दरही वाढवला आहे. याशिवाय स्पेशल व कोरा चहा व्यावसायिकांनी बंद केला असून इंधन अभावी अनेक टपरीधारकांनी चहा, वडापाव ऐवजी शितपेयाची विक्री सुरू केली आहे.
इंधन तुटवड्यामुळे त्याचेदर वाढल्याने सर्वसामान्य मेटाकुटीस आला आहे. दुसरीकडे तेल, इंधने वाढल्यामुळे व्यावसायिकांनी देखील खाद्यपदार्थांचे दर काही दिवसांपासून वाढवले आहेत. तसे पाहिल्यास स्वस्त तर पोटाची भूक भागविणारा पदार्थ म्हणून वडापावाला विशेष पसंती सर्वांनीच दर्शविली आहे. गरीबाला देखील परवडत असल्याने त्याच्यासाठी तो एक भूकेचा आधार बनून राहिला आहे.असे असताना तेल आणि इंधन याच्या कारणास्तव गरीबांचा आधार असलेला वडापाव महागला आहे. येथील व्यावसायिकांकडे यापूर्वी वडापाव हा १८ रुपयांनी विकला जात होता. सद्यस्थितीत त्याचा दर आता २० रुपयांवर येवून ठेपला आहे.www.konkantoday.com




