आज भारतीय जनता पार्टी रत्नागिरी तालुका दक्षिण ची SIR मार्गदर्शन व सक्रिय कार्यकर्ता संमेलन अध्यक्ष दादा दळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न….

आज भारतीय जनता पार्टी रत्नागिरी तालुका दक्षिण ची SIR मार्गदर्शन व सक्रिय कार्यकर्ता संमेलन जिल्हा कार्यालय येथे तालुका अध्यक्ष दादा दळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मतदार यादीचे पुनर्लोकन सध्या निवडणूक आयोगाच्या वतीने सुरू आहे..या कामात भाजप च्या blo 2 ने कशा पद्धतीने आपल्या बूथ वर काम करायचे आहे..याचे विस्तृत मार्गदर्शन तालुका अध्यक्ष दादा दळी यांनी केले, तर 6 एप्रिल हा भाजप स्थापना दिनाचे अनेक कार्यक्रमाचा आढावा दादा दळी यांनी घेतला..तर भारतीय जनता पार्टी चे संघटन विस्तार व निवडणुका या विषयावर देखील दादा दळी यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीचे सूत्र संचालन उपाध्यक्ष राजेश पाथरे यांनी केले तर प्रास्ताविक advocate अवधूत कळंबटे यांनी केले..भाजप च्या माजी महिला आघाडी अध्यक्षा ऐश्वर्या जठार यांनी देखील मार्गदर्शन केले..या बैठकीला भाजपचे तालुका अध्यक्ष दादा दळी, सरचिटणीस सुशांत पाटकर, महेश खानविलकर, उपाध्यक्ष राजेश पाथरे, अवधूत कळंबटे, महिला आघाडी अध्यक्षा अनघा साळवी, ऐश्वर्या जठार, भाई जठार, युवा मोर्चा चे अध्यक्ष चिराग खटकुळ, कामगार आघाडीचे संतोष बोरकर आदी तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button