
आंबा, काजू उत्पादकांची मदत वाढविण्यासाठी कार्यवाही करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे आदेश
आंबा, काजू उत्पादकांना जाहीर केलेल्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले असून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत कशी वाढविता येईल व जास्तीत जास्त मदत कशी देता येईल, याबाबत कार्यवाहीचे आदेश अर्थखात्याच्या प्रमुखांना दिले आहेत. त्यामुळे येणार्या काही दिवसांत महायुतीचे सरकार आंबा, काजू उत्पादकांच्या पाठीमागे उभे आहे, हे शब्दापलिकडे कृतीतून आहे. दिसेल असे पालकमंत्री नीतेश राणे यांनी म्हटले आहे.
राणे म्हणाले, बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळच्या बैठकीत आपण, उद्योगमंत्री उदय सामंत तसेच सर्व मंत्र्यांनी आंबा व काजू उत्पादकांना जाहीर केलेल्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले यात राज्य सरकारने जी मदत जाहीर केली आहे, त्याबाबत तीव्र प्रतिक्रियाची माहिती दिली. या मदतीनुसार प्रत्येक झाडामागे २२० रुपये मिळणार असून ही मदत तुटपुंजी आहे. कधीही मदत न मागणार्या आंबा उत्पादकांच्या पाठिशी राज्य सरकारने उभे राहिले पाहिजे, याकडे लक्ष वेधले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अर्थ विभागाला सदरचे आदेश दिले असल्याचे राणे यांनी म्हटले आहे.
www.konkantoday.com




