सेंद्रिय शेती ही भारताची संस्कृती आहे–कुलगुरु डॉ-संजय भावे.

दापोली :-जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित सेंद्रिय शेती महिला शेतकरी मेळावा, दापोली
“सेंद्रिय शेती ही भारताची संस्कृती आहे, एक शाश्वत विचार आहे. कालौघात परिस्थितीच्या दबावामुळे आपल्याला आधुनिक शेतीकडे वळावे लागले. परंतु आता पुन्हा सेंद्रिय शेतीचे महत्त्व जगाला पडू लागले आहे, असे प्रतिपादन डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय भावे त्यांनी आज येथे केले.
गव्हे येथील अमृते सेवा चैरिटेबल ट्रस्ट, भरारी दापोली तालुका बचत गट महासंघ आणि दापोली पंचायत समितीचा उमेद’ विभाग ह्यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या डॉ. स्वामिनाथन सभागृहामध्ये सेंद्रिय शेती महिला शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. बदलापूर तालुक्यातील बेंडशीळ येथील सेंद्रिय शेतीतील कृषिभूषण श्री राजेंद्र भट प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून उपस्थित होते. ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती शैलताई अमृते हयांनी मेळाव्याचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण संचालक आणि ट्रस्टचे सल्लागार डॉ. अशोक निर्बाण, भरारी महासंघाच्या उपाध्यक्षा श्रीमती रेश्मा झगडे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रमुख वक्ते राजेंद्र भट हयांनी सेंद्रिय
शेतीचे महत्व अधोरेखित करताना या शेती पद्धतीचे तत्वज्ञान, मुलभूत सूत्रे, इतिहास सांगितला. पाणी, वनस्पती आणि जमीन या तीन घटकांची नीट काळजी घेणे महत्वाचे असून निसर्गाने जे दिले तेच निसर्गाला परत करणे या तत्वाचे पालन केल्यास शेती निश्चितच फायदेशीर होते हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले.
ट्रस्टच्या सचिव सौ. अस्मिता परांजपे यांच्या स्वागत गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्याल आला. श्रीमती शैलजा अमृते त्यांनी प्रास्ताविकामध्ये कम्युनिटी हेल्थ वर्कर म्हणून सुरू झालेला त्यांचा जीवनप्रवास उलगडताना उत्कर्ष महिला मंडळ, भरारी महासंघ आणि अमृते ट्रस्टच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी डॉ. निर्बाण ह्यांनी देखील मनोगत व्यक्त केले. सौ. गोमती अमृते हांनी उपस्थितांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संस्थेच्या खजिनदार सौ. आशिका चाचड ह्यांनी आभार मानले.
या मेळाव्याला भरारी महासंघाच्या वतीने दर्शना राऊत, प्रियंका रजपूत, मंजुषा डोळस, प्रवीणा गोरीवले, दीपिका राऊत उपस्थित होत्या तसेच पंचायत समितीच्या उमेद विभागाचे अधिकारी सर्वश्री विशाल लांजेकर, अभिजित भंडारी, अजित ठसाळ, शशिकांत जाधव, अंकुर दुर्ग, श्रीमती रंजना पंदेरे, श्रीमती ज्योत्स्ना डडेमल, पत्रकार श्रेयस खटावकर आणि दापोली तालुक्यातील सुमारे 200 महिला शेतकरी उपस्थित होते.
सर्व उपस्थित पाहुण्यांना सन्मानचिन्ह आणि एक रोप देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button