सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या ताफ्यात नवीन वाहने

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना.नितेश राणे व गृहराज्यमंत्री ( ग्रामीण ) ना.डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते होणार हस्तांतरण सोहळा

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा पोलीस दलास प्राप्त झालेल्या नवीन वाहनांचा हस्तांतरण सोहळा गुरुवारी १९ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. पोलीस मुख्यालय येथील पोलीस कवायत मैदानावर सकाळी १० वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या शुभहस्ते व गृहराज्यमंत्री (ग्रामीण) ना. डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या कार्यक्रमाला विशेष निमंत्रित म्हणून खासदार नारायण राणे, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे व ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर देखील उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा पोलीस दलाचे आधुनिकीकरण आणि सुसज्जता करण्याच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यामुळे पोलीस दलाची गती आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button