सिंधुदुर्गात आंबा-काजू बागायतदारांचे आश्‍वासन दिल्याने आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित


कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या नुकसान भरपाईबाबत आम्ही तडजोड करणार नाही. आंबा बागायतदारांसाठी हेक्टरी ५ लाख, काजूला हेक्टरी ३ लाख नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. यासाठी रास्ता रोको आंदोलन करतानाचा आम्ही सविनय कायदे भंग आंदोलनाअंतर्गत पदयात्रा काढली. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हाधिकार्‍यांमार्फत आंबा, काजू बागायतदारांना दोन दिवसात अधिवेशन संपण्यापूर्वी विधिमंडळात नुकसान भरपाई जाहीर केली जाईल, असा निरोप देण्यात आला आहे. त्यामुळे आपले आजचे आंदोलन दोन दिवसांसाठी तूर्तास स्थगित करत आहोत, अशी घोषणा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button