साळवी स्टॉप येथील घनकचरा प्रकल्पात कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे  कोकणनगरवासीयही हैराण


रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील घनकचरा प्रकल्पात कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे परिसरात विषारी धुराचे लोट पसरत आहेत. यामुळे कोकणनगरसह आसपासच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे या गंभीर समस्येवर प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त नागरिकांनी मंगळवारी दुपारी नगरपरिषद कार्यालयावर धडक मोर्चा नेला आणि मुख्याधिकार्‍यांना या समस्येबाबत जाब विचारला.
साळवी स्टॉप येथील डम्पिंग ग्राऊंडवर मागील काही दिवसांपासून सातत्याने कचरा जाळला जात आहे यामुळे निर्माण होणारा दाट आणि दुर्गंधीयुक्त धूर स्टेट बैंक कॉलनी, क्रांतीनगर, कोकण नगर आणि कीर्ती नगर परिसरात पसरत आहे. या विषारी धुरामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असून खोकला, दमा, सर्दी आणि उलट्या यासारख्या आजाराचे प्रमाण बाढले आहे रात्रीपासून सकाळपर्यंत घराची बारे-सिडक्या बंद ठेवून राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button