
सहायक सरव्यवस्थापकाला जातिवाचक शिवीगाळ व मारहाण; कारवाईसाठी बौद्धजन संघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
रत्नागिरी : राजापूर अर्बन बँकेचे सहायक सरव्यवस्थापक लक्ष्मण म्हात्रे यांना जातिवाचक शब्द वापरून मारहाण केल्याच्या प्रकरणात संबंधित आरोपीवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी राजापूर तालुका बौद्धजन संघातर्फे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी लक्ष्मण म्हात्रे हे कर्जवसुलीसाठी गेले असता अर्बन को-ऑप. बँकेचे संचालक अल्ताफ संगमेश्वरी यांनी त्यांना जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच “जातीयतेचा गुन्हा दाखल कर, मी कायद्याला घाबरत नाही” असे म्हणत त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप संघटनेने निवेदनात केला आहे. त्यामुळे या प्रकरणात विशेष लक्ष घालून पोलिस अधीक्षकांना आरोपीस तातडीने अटक करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
दलितांवर होणारे अत्याचार थांबवून या प्रकरणात न्याय मिळावा, अशी मागणीही बौद्धजन संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना निवेदन देताना राजापूर तालुका बौद्धजन संघाचे अध्यक्ष महादेव गोठणकर, सचिव उमाकांत जाधव, दिलीप तांबे, एस. आर. कांबळे, संजय जाधव, गोकुळ कांबळे, दशरथ जाधव आदी उपस्थित होते.
दरम्यान, हे निवेदन पालकमंत्री उदय सामंत, राजापूरचे आमदार किरण सामंत तसेच पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनाही देण्यात आले आहे.
……………………..
दिव्य रत्नागिरी | News
🔗 वेबसाईट :
https://divyaratnagiri.com
📘 फेसबुक पेज :
https://www.facebook.com/दिव्य-रत्नागिरी-111446977265509
📺 यूट्यूब न्यूज चॅनेल :
https://www.youtube.com/channel/UCopNEJ-BiwPe79ryMo3Ckfg
🪀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला आजच जॉइन व्हा
https://chat.whatsapp.com/D6i6Q7Vh1Vp2YG35OooOx5?mode=gi_t




