संगमेश्वर तालुक्यात अवकाळी पाऊस, सोनवडे आणि पांगरी गावात वीज पडण्याचे प्रकार,


  • संगमेश्वर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळण्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. सोनवडे आणि पांगरी परिसरात झालेल्या या घटनेत सुदैवाने दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही

​सोनवडे येथील रहिवासी गजानन सनगरे यांच्या घरावर वीज कोसळली. या घटनेच्या वेळी घरातील सदस्य सुरक्षित राहिले, मात्र विजेचा झटका इतका तीव्र होता की घराचे वीज मीटर पूर्णपणे जळून खाक झाले आहे. घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते.
​ तसेच पांगरी . येथील सचिन घडशी यांच्या घराच्या अगदी जवळ असलेल्या नारळाच्या झाडावर वीज पडली. वीज पडल्यामुळे झाडाचे मोठे नुकसान झाले असून झाडाने पेट घेतला होता. घराच्या अगदी जवळ वीज पडल्याने घडशी कुटुंब थोडक्यात बचावले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button