
संकासुराच्या रूपात थेट व्यासपीठावर
जय मल्हार फेम देवदत्त नागे यांची धडाकेबाज एंन्ट्री


दापोली
शासनाच्या सांस्कृतिक संचालनालय व कै. मामा महाजन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली येथे दोन दिवस सांस्कृतिक महोत्सवाच आयोजन करण्यात आलं होत व्यासपीठावर गृहराज्यमंत्री योगेश कदम, दापोडीच्या नगराध्यक्ष कृपा घाग, जि.प. अध्यक्ष अस्मिता केंद्रे, भाजपच्या आमदार उमाताई खापरे, पद्मश्री दादा इदाते, खेडचे माजी नगराध्यक्ष बिपिनदादा पाटणे, आयोजक मिहीर महाजन आदि मान्यवर उपस्थित होते. याच वेळी कोकणातल्या शिंमगोत्सवातील संकासुराच्या रूपात समोर बसलेल्या मुलांची फिरकी घेत त्यांना मोबाईल वरती नाही तर मैदानावर खेळा असे संदेश देत थेट व्यासपीठावर कोकणातल्या शिंमगोत्सवातील संकासुराचे रूप अवतरले. कार्यक्रम सुरू असताना अचानक घडलेला हा सस्पेन्स अनेकांना कळला नाही मात्र हे होते जय मल्हार फेम मधील श्री खंडेरायाची भूमिका साकारणारे देवदत्त नागे यांना पाहून प्रेक्षकांना व व्यासपीठावरील मान्यवरांना एक मोठा सुखद धक्का बसला.
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सर विश्वेश्वरैय्या सभागृहात झालेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर अवतरलेल्या या संकासुराच्या रूपाचे सगळ्यांनीच स्वागत केले. कोकणातील शिमगोत्सव माझा आवडता आहे अनेक जणांची पाऊल ही थेट शिंमगोत्सवात कोकणाकडे वळतात पण मला येता आलं नाही माझी फार दिवसापासून ची इच्छा होती की संकासुराच्या रूपात यायच लोकांना भेटायचं मुलांना मैदानावर खेळण्याचा तर काहींना व्यसनमुक्तीचा संदेश द्यायचा आणि ती इच्छा आज या कोकणातील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजक मिहीर महाजन यांच्या निमंत्रणामुळे मला पूर्ण करता आली. मी गाडीतून दापोलीत आलो तेव्हाच वेश बदलून मी कार्यक्रमात व्यासपीठावर आलो.
येळकोट येळकोट जय मल्हार…येळकोट येळकोट जय मल्हार… असा श्री खंडेरायाचा गजर करत जय मल्हार फेम ज्येष्ठ अभिनेते देवदत्त नागे यांनी कोकणातील दापोलीतील कलाकारांशी थेट संवाद साधला. श्री खंडेरायाची भूमिका साकारताना आपण दर चंपाषष्ठीला जेजुरीला जाऊन श्री खंडेरायांचे दर्शन घेतो. मी गावी अलिबागला होतो आजारी होतो आणि मला चंपाषष्ठीला श्रीखंडेरायांच्या भेटीला जायचं होतं मी मनातून प्रार्थना करतो की मला तुमच्या भेटीला जायचं होतं हा खंड पडू नये यासाठी माझी प्रार्थना सुरू होती याच वेळेला एका मित्राचा नवीन गाडी घेतल्याचा फोन आला की देवा नवीन गाडी घेतली आहे आपल्याला जेजुरीला जायचं आहे आणि मला जाता आलं अशी खास आठवण सांगतो श्री खंडेरायांच्या आशीर्वादाचा प्रत्यय अलौकिक आहे त्यांची प्रचिती अनेकांना येते असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.
जय मल्हार फेम मालिकेत आम्ही भूमिका साकारत असताना या सगळ्या बागे मोठी टीम असते खूप मोठी फळी असते. याच फळीतील येथील एक स्थानिक कार्यकर्ता आहे दापोली दाभोळ उसगाव येथील सुयोग वैद्य आहे त्यालाही व्यासपीठावर बोलावून घेतो हा कॅमेराच्या मागील एक खंदा खिलाडी आहे असे म्हणत देवदत्त नागे यांनी या स्थानिक कलाकाराचे कौतुक केले




