श्रीदेव गणपतीपुळे प्रशासनाने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी खिचडी प्रसाद भोजनाची


पश्चिम आशियातील इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जिल्ह्यात सर्वत्र व्यावसायिक गॅसच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे येथील संस्थान श्रीदेव गणपतीपुळे प्रशासनाने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी खिचडी प्रसाद भोजनाची वेळ एक तासाने वाढवली आंहे.
देवस्थानने भाविकांच्या सोयीसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले असून आता दुपारी १२.३० ते ३ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ७.१५ ते रात्री ४.४५ वाजेपर्यंत मोफत महाप्रसाद उपलब्ध करून दिला जाणार आहे. इराणमधील युद्धामुळे व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. पुरवठा बंद असल्याने गणपतीपुळे परिसरातील अनेक हॉटेल्स आणि खानावळी सद्यस्थितीत बंद पडल्या आहेत. यामुळे दर्शनासाठी येणाच्या हजारो भाविकांच्या जेवणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून त्यांची गैरसोय होत आहे.
भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन देवस्थानच्या पंचकमिटीने सामाजिक बांधिलकी जपत दररोज दिल्या जाणार्‍या मोफत खिचडी प्रसाद भोजनाच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून या संकटाच्या काळात जास्तीत जास्त भाविकांना अन्नाचा लाभ घेता येईल. हॉटेल व्यावसायिक अडचणीत असताना देवस्थानने उचललेले पाऊल भाविकांसाठी आधार ठरत आहे. जास्तीतजास्त भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन गणपतीपुळे देवस्थान पंचकमिटीने केले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button