शिवसेनेच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा विभागीय संपर्कप्रमुखपदी आमदार किरण सामंत


रत्नागिरी : शिवसेनेकडून राज्यातील विभागीय संपर्क प्रमुख पदांची घोषणा करण्यात आली असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विभागीय संपर्कप्रमुखपदी राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची निवड करण्यात आली आहे.

शिवसेनेकडून नुकतीच विभागीय संपर्कप्रमुख पदांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना रत्नागिरी, सिंधुदुर्ग विभागीय संपर्कप्रमुखपदी राजापूर–लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांची निवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निवडीबद्दल आमदार किरण सामंत यांचे कार्यकर्त्यांकडून अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button