‘व्हीएसआर’कंपनीचे संचालक व्ही. के. सिंग यांची तीन दिवस चौकशी- दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार विमान अपघात प्रकरण!

पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात झालेल्या मृत्यू प्रकरणात व्हीएसआर कंपनीचे प्रमुख व्ही.के.सिंग यांची तीन दिवस चौकशी करण्यात आली. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (सीआयडी) सिंग यांची गेल्या आठवड्यात सलग आठ तास चाैकशी केली हाेती. त्यानंतर पुन्हा दाेन दिवस व्ही.के.सिंग यांची चाैकशी करण्यात आली. सिंग यांची आतापर्यंत तीन दिवस चाैकशी करण्यात आल्याची माहिती सीआयडीतील अधिकाऱ्यांनी दिली.

व्हीएसआर कंपनीचे अपघातग्रस्त विमान कधी खरेदी करण्यात आले ? त्याचा वापर आतापर्यंत नेमका कसा कसा झाला ? विमानाची देखभाल कशाप्रकारे केली जात होती ? विमानात काही तांत्रिक अडचण हाेती का ? विमानाची अपघातापूर्वी सद्यस्थिती अहवाल, पायलट, तसेच क्रु मेंबर नेमणूक, विमान बुकिंग काेणी केले, मुंबई ते बारामती विमान कसे गेले, त्यादृष्टीने सिंग यांची चैाकशी करण्यात आली आहे.

विमान अपघात तपास संस्थेने (एएआयबी) याबाबत प्राथमिक अहवाल दिला आहे. तो अंतिम स्वरुपात मिळणे गरजेचे आहे. सीआयडीने व्हीएसआर कंपनीला विविध प्रश्नांची उत्तरे मागितली हाेती. मात्र, अद्याप कंपनीने समाधानकारक उत्तरे दिली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे विमानातून निघाले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीत आले होते. एकाच दिवशी त्यांच्या बारामती परिसरात चार सभा होणार होत्या. सकाळी आठच्या सुमारास मुंबईहून विमानाने उड्डाण केल्यानंतर बारामती विमानतळावर विमान उतरण्याच्या तयारीत असताना अपघात झाला. या अपघातात पवार यांच्यासह वैमानिक सुमित कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक, अटेंडंट पिंकी माळी, पवार यांचा अंगरक्षक विदीप जाधव यांचा मृत्यृ झाला.

विमान अपघात प्रकरणाची नोंद बारामती पाेलीस ठाण्यात करण्यात आली आहे. बारामती पोलीस ठाण्यातील दाखल प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button