वैश्य समाजाचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्थेचे मोठे योगदान : डॉ. विकास शेट्ये


पाचल : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था फोंडाघाट या शाखेची 16 वी शाखा आज रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पाचल या गावी डॉ. विकास शेट्ये यांच्या शुभहस्ते सुरू करण्यात आली. याप्रसंगी शुभेच्छा देताना आणि मनोगत व्यक्त करताना डॉ. विकास शेट्ये अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाज सेवा संस्था. यांनी सांगितले की जसे आम्ही वैश्य समाजाचे संघटन करतो तसेच या समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था कार्य करत आहे त्यांचे हे कार्य आदर्शवत असे आहे.

34 वर्ष कार्यरत असलेली ही संस्था 200 कोटींच्या ठेवी आणि 127 कोटींचा कर्ज व्यवहार करत आहे. यामध्ये छोट्या उद्योजकांना कर्ज पुरवठा करण्यासाठी या पतसंस्थेने मोठे काम केले आहे. ऐसी कर्मचारी आणि 78 अल्प बचत प्रतिनिधी. काम करत असून भाग भांडवलाच्या कितीतरी पटीने संस्थेने गुंतवणुका केलेले आहेत त्यामुळे भागीदारकांना या पतसंस्थेबद्दल विश्वास आहे आणि म्हणूनच पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. गणपत वळणजू आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ यांनी या पतसंस्थेचा विस्तार सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी केला आहे.
राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणेच संपूर्ण डिजिटल सेवा पुरविला जातात. हे अतिशय अभिमानाचे बाब असून संस्थेच्या स्थापनेपासून सतत अ वर्गात असणारी ही पतसंस्था आता पाचल परिसरातील ठेविदार हितचिंतक आणि गरजू उद्योजक यांचा आधार बनेल. असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. गणपत वळणजू. पाचल वैश्य समाज संघटनेचे अध्यक्ष श्री. किशोरभाई नारकर पाचल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. अण्णा पाथरे, रत्नागिरी जिल्हा वैश्य समाजाचे सचिव श्री. नरेंद्र बेलवलकर, महिला उपाध्यक्ष सौ. शिवांगी प्रसादे, जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री. कौस्तुभ भिंगार्डे, श्री. यशवंत पाडावे, श्री. कोळवणकर, श्री. विलास प्रसादे, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. अंधारे मलकापूर वैश्य समाजाचे माजी अध्यक्ष श्री. अण्णा बेर्डे, श्री. विलास नारकर, श्री. उदय सक्रे, श्री. अनंत कोलते. ठाणे जिल्हा वैश्य समाज महिला अध्यक्ष सौ. नारकर. पाचलचे सरपंच तसेच पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पावस्कर आणि सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button