विधानभवनाला बॉम्बनं उडवण्याची धमकी,विधानभवनात सर्च ऑपरेशन सुरु


विधानभवनाला बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आलीय. विधानभवनात बॉम्ब ठेवल्याचा इमेल प्राप्त झालाय. विधानभवनातून सर्वाना बाहेर काढल्याची माहिती समोर येत असून विधानभवनात सर्च ऑपरेशन सुरु आहे.बॉम्बच्या अफवेमुळे सर्वांना गेटवरच रोखण्यात आलंय. आमदार राम शिंदे यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

बॉम्ब डिस्पोसल आणि डिटेक्शन स्कॉड आणि डॉग स्कॉडकडून तपासणी सुरु आहे. विधानभवानसोबत आणखी 4 ठिकाणी धमकी देण्यात आली. सुरक्षा आणि तपास अधिकारी तपासणी करत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आलेले अधिवेशन आहे. धमकी मिळाल्याने त्याअनुषंगाने तपासणी सुरु असल्याचे राम शिंदेंनी सांगितले.अधिकची माहिती घाईन लवकर उघड करणे योग्य ठरणार नाही. स्टॉक एक्सेचेंज, मेट्रो, हॉयकोर्ट आणि बॅंक या ठिकाणी धमकी देण्यात आलीय. यासाठी वेळही देण्यात आली आहे. त्या अनुशंगाने आवश्यक ती कारवाई सुरु आहे. सकाळी 6 वाजून 57 मिनिटांनी सीपीएच्या मेल वर एक ईमेल आलाय. यानंतर पोलिसांनी परवानगी घेऊन विधानभवनात प्रवेश केला. चौकशीतील माहिती जाहीर केली जाईल, असे राम शिंदे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button