वालावलकर रुग्णालयात ३ ते ५ एप्रिल दरम्यान विशेष लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया शिबिर

नामवंत डॉक्टरांचा सहभाग

चिपळूण : कोकणातील महिलांना अत्याधुनिक आणि कमीत कमी वेदनादायी शस्त्रक्रियांचा लाभ मिळावा या उद्देशाने, श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट संचलित बी.के.एल. वालावलकर हॉस्पिटलमध्ये ३ ते ५ एप्रिल २०२६ या कालावधीत विशेष ‘लॅपरोस्कोपिक गायनॅकॉलॉजी’ (स्त्रीरोग) शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आणि अनुभवी डॉक्टर्स रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रगत लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. प्रशांत भामरे, डाॅ. पंकज कुलकर्णी, लॅपरोस्कोपिक स्त्रीरोग तज्ञ आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ.आशिष पारुलेकर, प्रगत एंडोस्कोपिस्ट डॉ. संजय पाटील,
डॉ. मल्लिका शेट्ये आदी उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात सहभागी होण्यासाठी गरजू रुग्णांनी ९१४५०३२५९९ /
९२७२८९७८३४ या क्रमांकावर संपर्क साधून आपली नावनोंदणी ३१ मार्चपर्यंत करावी.

शिबिराची वैशिष्ट्ये व उपचार –
या शिबिरात पोटावर मोठा छेद न घेता ‘की-होल’ सर्जरी (लॅपरोस्कोपी) द्वारे गर्भाशयाची पिशवी काढणे, गर्भाशयातील गाठी, अंडशयातील गाठी यांवर शस्त्रकीया केल्या जातील. तसेच अंग बाहेर येणे पाळीच्या वेळी अती रक्तस्राव इत्यादी लॅपरोस्कोपीमुळे रुग्णाला वेदना कमी होतात आणि जखम लवकर भरून येते. तसेच रुग्ण हॉस्पिटल मध्ये कमी दिवस राहून घरी लवकरात लवकर जाऊ शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button