लोटे औद्योगिक वसाहतीमध्येDKIC प्रायव्हेट लिमिटेड या केमिकल कंपनीतभीषण स्फोटाची घटना,पाच ते सहा कामगार गंभीर स्वरूपात जखमी


रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये पुन्हा एकदा एका कंपनीत स्फोट होण्याची घटना घडली आहे यामध्ये काही कामगार जखमी झाले आहेत ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. लोटे एमआयडीसीमधील DKIC प्रायव्हेट लिमिटेड या केमिकल कंपनीत झाली या स्फोटात सुमारे पाच ते सहा कामगार गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत.स्फोट इतका तीव्र होता की परिसरात मोठा आवाज झाला आणि कंपनी परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीमध्ये सलग दोन स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या स्फोटात कामगार गंभीररित्या भाजले असून त्यांना तातडीने लोटे औद्योगिक वसाहतीतील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या कंपनी परिसरात तपास सुरू असून नेमका स्फोट कशामुळे झाला आणि त्यामागील कारण काय आहे याचा शोध घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button