
लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात डाॕ बाबासाहेब आंबेडकर तंंत्रशास्त्र विद्यापीठ उपकेंद्र सुरु करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी- पालकमंत्री डाॕ उदय सामंत


रत्नागिरी, दि. 20 ) : लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात डाॕ बाबासाहेब आंबेडकर तंंत्रशास्त्र विद्यापीठ (‘बाटू’)चे उपकेंद्र तात्काळ सुरु करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या.

लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आज अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन येथील कामकाज आणि अडीअडचणींबाबत आढावा घेतला. अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रांताधिकारी जीवन देसाई, जि. प. सदस्य बाबू म्हाप, शासकीय तंत्रनिकेतनचे प्र. प्राचार्य अजय हुंबरीकर, प्रा. पियुष गजबे, प्रा. उत्तमसखाने काकडे उपस्थित होते. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य यु. व्ही. पाटील, ‘बाटू’ चे व्हाइस चान्सलर कारभारी काळे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत यांनी यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील स्टाफ, विद्यार्थी संख्या, ॲडमीशन, वसतिगृह आदी विषयांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले, या महाविद्यालयाच्या परिसरात ‘ ‘बाटू’ चे उपकेंद्र सुरु करण्याच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करा. त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल. विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह सुरु करा. पुढच्या शनिवारी महाविद्यालयाला पुन्हा भेट देणार आहे, त्यापूर्वी येथील सर्व परिसर स्वच्छ करा. महाविद्यालयातील परिसरात स्वच्छता ठेवा. त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करा.
तत्पूर्वी पालकमंत्री डॉ. सामंत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाचाही आढावा वैद्यकीय महाविद्यालयात घेतला.
000




