लांजा तालुक्यात वीज बिलांची थकबाकी वाढली, ८३ लाख ६७ हजारांची थकबाकी


लांजा तालुक्यात वीजबिलांच्या थकबाकीचा आकडा तब्बल ८३ लाख ६७ हजार रुपयांवर पोहोचला आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तालुक्यात एकूण ३७ हजार ७७८ वीज ग्राहक असून, विविध प्रकारच्या ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याचे समोर आले आहे.
तालुक्यात लांजा १, लांजा २, भांबेड आणि साटवली अशी चार शाखा कार्यालये कार्यरत आहेत. या कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक, शासकीय, पाणीपुरवठा तसेच पथदिवे अशा विविध ग्राहकांकडून थकबाकी वाढली आहे. यामध्ये घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक व शासकीय ग्राहकांची मिळून ३९ लाख ४ हजार रुपये, पाणीपुरवठा ग्राहकांची ३६ लाख ८२ हजार रुपये आणि पथदिव्यांची ७ लाख ८१ हजार रुपये अशी एकूण ८३ लाख ६७ हजार रुपयांची थकबाकी आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button