
लक्ष्मी ऑरगॅनिक ’विरोधात ११ ग्रा. पं. चे ठराव
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल लिमिटेड कंपनी विरोधात परिसरातील अकरा ग्रामपंचायतींनी ठराव केले असल्याने कंपनी विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला अधिक धार मिळाली आहे. यासंदर्भात बुधवारी प्रमुख आंदोलकांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आपली पुढील भूमिका स्पष्ट करताना जोपर्यंत कंपनी बंद होत नाही तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करत संविधानिक व लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.
आंदोलकांच्यावतीने यासंदर्भात संजय आंब्रे, संजय साळवे, रवींद्र गोवळकर, अविनाश आंब्रे, किशोर आंब्रे, संजय आंब्रे, उदय घाग, सुबोध सावंत देसाई आदींनी बुधवारी रत्नागिरीत जाऊन जिल्हाधिकारी मनुज जिंदल, अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी यांची भेट घेतली.
खेड व चिपळूण तालुक्यातील धामणदेवी, आंबडस, भेलसई, लोटे, गुणदे, आवाशी, चिरणी, घाणेखुंट, सोनगाव, कालुस्ते बुद्रुक आणि शेल्डी अशा एकूण अकरा ग्रामपंचायतींनी एकमुखाने ठराय मंजूर करून कंपनी विरोधात भूमिका घेतली असल्याने या ग्रामपंचायतींच्या ठरावांसह निवेदन सादर करण्यात आले सर्व ग्रामपंचायतींनी एकत्र येत, जनतेच्या हितासाठी आणि न्यायासाठी हा लढा कंपनी बंद होईपर्यंत पुर एकमुखी ग्वाही दिली आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल कंपनीमार्फत घातक ’पिफास’चे उत्पादन घेत असल्याचा आरोप आंदोलकांकडून केला जात आहे त्यामुळे ही कंपनी बंद करावी या मागणीसाठी गेले कित्येक दिवस कोकण नागरी संघर्ष समितीमार्फत कंपनीच्या गेट समोर सुरु असलेल्या धरणे आंदोलनालाही अकरा ग्रामपंचायतीच्या या भूमिकेमुळे मोठा पाठिंबा मिळाला आहे.
www.konkantoday.com



