
लंडनमध्ये होणार जगातले सर्वोत्तम मराठी भाषा केंद्र
मुंबई मराठी भाषेला अभिजात भाषेचा दजी मिळाल्यानंतर मुंबईत मराठी भाषा भवन तर होणारच आहे, शिवाय नवी मुंबईत ऐरोली येथे मराती भाषा उपभवन होणार आहे. त्यापेक्षाही अधिक मोठी गोष्ट म्हणत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावने लंडन येथे जगातले मातृभाषेतले पहिले वैश्विक मराठी भाषा केंद्र होत आहे. शिवाय मुंबईतील मराठी भाषा केंद्राचे फेब्रुवारी २०२७ पर्यंत लोकार्पण होईल, अशी ग्वाही उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.
विधान परिषदेत सदस्य भाई जगताप यानी नियम ९३ अंतर्गत मराठी भाषेविषयी प्रश्न उपस्थित केला. मंत्री उदय सामंत म्हणाले की, मराठीचा प्रचार आणि प्रसार करण्यात शासन मागे राहिलेले नाही. नाशिकमध्ये आपण मराठी भाषा विश्व समेलन भरविले. मराठी भाषा भवनाची संकल्पना २०१३ मध्ये मांडण्यात आली. मराठी भाषा भवनसाठी मुंबईत थोबी तलावची जागा निवडली. त्यावेळी ११ कोटी मंजूर करण्यात आले. ही रक्कम नंतर वाढत वाढत १७कोटी, ४९ कोटी झाली. मात्र ही जागा समुद्राच्या समपातळीत असल्याने तेथे पावसाळयात काम करणे अवघड झाले होते. आता मराठी भाषा भवनसाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२७ पर्यंत मराठी भाषा भवनचा काही भाग महायुती सरकारकडून लोकार्पण करण्यात येईल, अशी ग्वाही उदय सामंत यांनी दिली.
www.konkantoday.com




