राष्ट्रीय महामार्गातील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय-चंद्रशेखर बावनकुळे


राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या अनेक प्रकल्पांमुळे भूसंपादनाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा वेगवान निपटारा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यात ५७ नवीन लवादांची नियुक्ती केली असून, यामुळे अनेक वर्षांपासून मोबदल्याविना रखडलेले २८ हजारांहून अधिक प्रकल्पग्रस्तांचे दावे आता जलदगतीने निकाली निघणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकर्‍यांचे हित लक्षात घेऊन यासाठी विशेष पुढाकार घेतला. केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत केंद्र व राज्य सरकारसोबत बैठकी होऊन राज्यातील विविध भागातील प्रकरणाचा अभ्यास करून सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आता लवादांची नियुक्ती झाली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button