
राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत गावखडी येथे आरोग्य शिबिर संपन्न
रत्नागिरी : राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत आयुष ग्राम योजना अंतर्गत गावखडी (ता. रत्नागिरी) येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये नागरिकांना आयुर्वेद तज्ञांकडून विविध आजारांवर मार्गदर्शन व उपचार सेवा देण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना आयुर्वेद पद्धतीच्या उपचारांचा लाभ मिळावा, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या आरोग्य शिबिराला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, जिल्हा परिषद सदस्य पावस महेंद्र मांडवकर,जिल्हा परिषद सदस्य गोळप नंदकुमार मुरकर, पंचायत समिती सदस्य गावखडी सौ. स्वाती शिंदे, पंचायत समिती सदस्य पावस नामदेव कोकरे, पंचायत समिती सदस्य गोळप नेताजी पाटील , सामाजिक कार्यकर्ते किरण तोडणकर, माजी पंचायत समिती सदस्य स्मिता भिवंदे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मिताली मोडक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव, माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे, प्रशासक ग्रा. पं. गावखडी गौतम पाटील,स्थानिक वैद्यकीय तज्ञ डॉ. गजानन रानडे,तसेच समिधा भाटकर, माधवी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या अध्यक्षीय भाषणात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी आयुर्वेद पद्धतीचा वापर दैनंदिन जीवनात करण्याचे महत्त्व सांगितले. संतुलित आहार, योग्य दिनचर्या व आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंब केल्यास शरीर निरोगी व रोगमुक्त राहू शकते,असे मार्गदर्शन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले. तसेच उपस्थित जिल्हा परिषद सदस्य पावस महेंद्र मांडवकर, प्रशासक गौतम पाटील आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल पाटील, डॉ. मुक्तेश्वरी पाखरे, डॉ. शीतल सूर्यवंशी, डॉ पलशेतकर, डॉ. घुले तसेच समुदाय आरोग्य अधिकारी श्रीमती एस. एल. बोमान्नावर, आरोग्य सहाय्यक बापुराव दराडे उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पावस येथील सर्व आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका यांनी मोलाचे सहकार्य केले.
शिबिरामध्ये नागरिकांची तपासणी करून त्यांना आयुर्वेदिक औषधोपचार, आहार-विहाराबाबत मार्गदर्शन तसेच विविध आजारांवर सल्ला देण्यात आला. ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.




