राज्य सरकारच्या निर्णयानुसार रत्नागिरीत होणार अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय

त्नागिरीत होणार अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय
राज्यातील वाढती लोकसंख्या, शहरीकरणाचा वेग आणि भौगोलिक विस्तार विचारात घेऊन प्रशासकीय कामकाजाचा भार हलका करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, ठाणे, पुणे, नागपूर आणि रत्नागिरीसह राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये निर्माण करण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
जिल्ह्यांची लोकसंख्या, जिल्ह्यांचे भौगोलिक क्षेत्र, जिल्ह्याचे दुर्गम क्षेत्र, तालुक्यांची संख्या, प्रशासकीय सोय, स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन महसूल विभागाने ११ नवे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये निर्मिती प्रस्तावित केली होती, अशी माहिती सुद्धा मंत्री बावनकुळे यांनी सभागृहात दिली. त्यामुळे आता शासकीय कार्यालयांतील कामकाजाचा वाढता व्याप आणि नागरी क्षेत्रातील वाढलेली लोकसंख्या याकरिता हे नवे ११ अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मिती महत्त्वाची ठरणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button