
राजापूर तालुक्यातील डोंगर दत्तवाडी येथे बैल आडवा आल्याने रिक्षा पलटी
राजापूर तालुक्यातील डोंगर दत्तवाडी येथे अचानकपणे बैल आडवा आल्याने रिक्षा उलटून झालेल्या अपघातात रिक्षा चालकासह प्रवासी जखमी झाले असल्याची घटना घडली आहे.
रिक्षा चालक सुभाष शिरवडकर (४०) हे आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच ०८ एक्यू ०५१०) मधून डॉ. सुभाष डाग यांना घेऊन चौके ते डोंगर असे जात होते.. त्यांची रिक्षा दत्तवाडी स्टॉपजवळ आली असता अचानकपणे त्यांच्या रिक्षेसमोर एक बैल आडवा आल्याने रिक्षा उलटून हा अपघात झाला. यामध्ये रिक्षा चालकासहीत प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
www.konkantoday.com




