
राजापुरात २० मार्चला शासकीय योजना कार्यशाळा
राजापूर : शासकीय अधिकारी व अनुलोम मित्र यांची संयुक्त बैठक म्हणजेच शासकीय योजना कार्यशाळा २० मार्च रोजी पंचायत समिताच्या किसान भवन सभागृहात सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत आयोजित करण्यात आली आहे.
अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सन २०१६ पासून संपूर्ण राज्यात सुरू आहे. हे कार्य अधिक गतीने पुढे नेण्यासाठी शासकीय योजना कार्यशाळा तसेच शासकीय अधिकारी व अनुलोम मित्र संयुक्त परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी सभापती नंदिनी कदम, उपसभापती अभिजीत गुरव, तहसीलदार विकास गंबरे, पोलीस निरीक्षक अमित यादव, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले, कृषी अधिकारी प्रभाकर आपटे, तालुका कृषी अधिकारी अमोल सकपाळ, अनुलोम कोकण प्रांत सदस्य प्रेरणा पवार, अनुलोम कोकण विभाग प्रमुख रवींद्र भोवड, अनुलोम उपविभाग संवादिनी तनया शिवलकर आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अनुलोम भाग जनसेवक लांजा, राजापूर, साखरपा प्रज्योत खानविलकर यांनी केले आहे.




