
रत्नागिरी शहरालगतच्या खेडशी येथे ज्वेलर्सचे दुकान फोडून ५५ हजारांचा ऐवज चोरीला
रत्नागिरी शहरालगतच्या खेडशी येथे ज्वेलर्सचे दुकान फोडून चोरट्यांनी ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी विजय रामचंद्र सागवेकर (५६, रा. खेडशी बोरभाटले रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दुकान फोडणार्या अज्ञातांवर गुन्हा दाखल केला. सागवेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे खेडशी नाका येथे विजय ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. २१ मार्च रोजी रात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी दुकानातील चांदीची जुनी मोड, चांदीची चेन, ब्रेसलेट व रोख रक्कम ७ हजार असा मिळून ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला अशी नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसात करण्यात आली आहे.
www.konkantoday.com




