रत्नागिरी येथील समुद्रकिनार्‍यावर बेकायदेशीर मासेमारी, २ नौका मालकांना दंड


रत्नागिरी येथील समुद्रकिनार्‍यावर बेकायदेशीररित्या डल्ला मारणार्‍या मच्छीमारांवर कारवाई करायला प्रशासनाने सुरुवात केली आहे. गुहागर तालुक्यातील अंजनवेल समुद्रात नियमांची पायमल्ली करणार्‍या दोन नौकांवर सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रत्नागिरीतील एका नौकामालकाला ५ लाख तर गुजरातमधील मालकाला ३ लाख २७ हजार ८०० रुपयांचा मोठा दंड सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुवेस्कर यांनी ठोठावला आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी स्वप्निल चव्हाण, पर्यवेक्षक विनायक शिंदे आणि सुरक्षारक्षक अक्षय मयेकर हे नवदुर्गा गस्ती नौकेतून अंजनवेल दीपस्तंभासमोर गस्त घालत होते. गेल्या शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास, समुद्रात २० वाव अंतरावर रत्नागिरीतील अ. र. मंयेकर यांच्या मालकीची ’श्री सद्गुरु कृपा’ ही नौका बंदी असलेल्या एलईडी प्रकाशात मासेमारी करताना पकडण्यात आली. त्याचवेळी, गुजरात दिव येथील विनोद सोळंकी यांची ’ध्रुवशक्ती’ ही ट्रॉलिंग नौकाही बेकायदेशीरपणे जाळे टाकताना सापडली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button