रत्नागिरी भूषण भागोजीशेठ कीर यांच्या पुतळ्याजवळ तातडीने प्रकाश व्यवस्था करावी

युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांची नगराध्यक्षांकडे निवेदनाद्वारे मागणी

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथे बसविण्यात आलेल्या रत्नागिरी भूषण भागोजीशेठ कीर यांच्या नव्याने बसविण्यात आलेल्या पुतळ्याजवळ तातडीने प्रकाश व्यवस्था करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी प्रसाद सुरेश सावंत यांनी केली आहे.
यासंदर्भात रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांच्यासोबत युवासेना शहर प्रमुख आशिष चव्हाण, नाचणे विभाग समन्वयक रितेश लोखंडे, शिवसेना शाखाप्रमुख प्रसाद रायगंकर, ओमकार कारेकर उपस्थित होते.
नगराध्यक्षांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “रत्नागिरी भूषण भागोजीशेठ कीर यांचा पुतळा साळवी स्टॉप येथे बसविण्यात आला आहे, हे स्वागतार्ह आहे. भागोजीशेठ कीर यांना भंडारी समाजाबरोबरच बहुजन समाजामध्ये मानाचे स्थान आहे. त्यामुळे त्यांचा नुसता पुतळा उभारून चालणार नाही तर त्याची पावित्र्यता राखणेही तितकेच गरजेचे आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी हा पुतळा दिसतच नाही ही शोकांतिका आहे. त्यामुळे तातडीने या ठिकाणी प्रकाश व्यवस्था करण्यात यावी अशी आपणाकडे या निवेदनाद्ववारे मागणी करत आहे.”
यासंदर्भात नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली यावर लवकरच उपाययोजना करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button