
रत्नागिरी परिमंडलात १८ कोटींची थकबाकी
विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने रत्नागिरी परिमंडल अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील १ लाख १८ हजार २३७ ग्राहकांकडे १८ कोटी ६६ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यांत परिमंडल अंतर्गत २ हजार ५१८ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकीदार वीजग्राहकांनी बिलांचा भरणा देय दिनांकापूर्वी करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
यामध्ये रत्नागिरी परिमंडल अंतर्गत येणार्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरगुती १ लाख ०१ हजार २९२ ग्राहकाकडे ०९ कोटी ४१ लाख, व्यावसायिक १० हजार ५६६ ग्राहकांकडे ३ कोटी ६५ लाख, औद्योगिक १ हजार ५४८ ग्राहकाकडे ३ कोटी १० लाख, सार्वजनिक सेवा ४ हजार ५२० ग्राहकांकडे २ कोटी २७ लाख आणि इतर वर्गवारीतील ३११ ग्राहकांकडे २५ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी विभागात २८ हजार ७२६ ग्राहकांकडे ०३ कोटी ७६ लाख, चिपळूण विभागात १३ हजार ७७८ ग्राहकांकडे २ कोटी ०६ लाख, खेड विभागात १५ हजार ६८० ग्राहकांकडे ०२ कोटी ४९ लाख रुपयांची बकबाकी आहे. यामुळे जिल्ह्यातील ०१ हजार ७२१ ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडीत केला आहेwww.konkantoday.com




