रत्नागिरी तालुक्यात व शहरात आज रात्री सव्वा आठचे दरम्याने सौम्य भूकंपाचा धक्का बसला


रत्नागिरी तालुक्या सहरत्नागिरी शहरात काहीवेळा पूर्वी रिश्टर स्केलचा सौम्य भूकंपाचा धक्का बसला. आज (१२ मार्च) रात्री ८ वाजून १९ मिनिटांनी हा भूकंप जाणवला.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश १६.९२ उत्तर आणि रेखांश ७३.४४ पूर्व असा रत्नागिरी भागातच जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होता.२.८ रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता कमी असली तरी काही भागांतील नागरिकांना जमिनीला सौम्य कंप जाणवल्याने ते घराबाहेर आले होते.

प्रशासन या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर भूकंपाचा धक्का बसल्याचे वृत्त टाकले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button