
रत्नागिरी तालुक्यातील चाफेरी येथे बेवारस मृतदेहाच्या माहितीसाठी पोलिसांचे आवाहन
रत्नागिरी तालुक्यातील जयगड ते खंडाळा बायपास रस्त्यावरील चाफेरी उंबरटेंबा येथे आढळून आलेल्या मृतदेहाबाबत माहिती देण्याचे आवाहन जयगड पोलिसांकडून करण्यात आले आहे. १७ मे २०२५ रोजी हा मृतदेह सडलेल्या. अवस्थेत ग्रामस्थांना दिसून आला होता. याबाबत चाफेरीचे पोलीस पाटील बुद्धदास पवार यांनी पोलिसात खबर दिली होती. या घटनेला वर्ष उलटूनही अद्याप या मृताच्या नातेवाईकांचा शोध लागू शकला नाही. तरी कोणाला या मृताबाबत काही माहिती असल्यास जयगड सागरी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.www.konkantoday.com




