
रत्नागिरी जिल्हा परिषदेत महायुतीला राष्ट्रवादीचा पाठिंबा
आमदार शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, गटनेते अजय बिरवाटकर यांची घोषणा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आमदार शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव आणि गटनेते अजय बिरवाटकर यांनी संयुक्तपणे ही घोषणा केली.
जिल्हा परिषदेत स्थिर आणि विकासाभिमुख कारभारासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले. महायुतीसोबत काम करताना जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देण्यात येईल, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.




