
रत्नागिरीमध्ये चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती साजरी


रत्नागिरी : जगातील एकमेव चक्रवर्ती सम्राट राजा अशोक यांची जयंती जिल्हा शासकीय रुग्णालयाशेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे साजरी करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी शाखेच्या वतीने २६ मार्च रोजी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेचे अध्यक्षस्थान आयु. एल. व्ही. पवार यांनी भूषविले. तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि चक्रवर्ती रजा सम्राट अशोक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. बुद्ध पूजा पाठ पठण, प्रमुख वक्ता म्हणून आयु. अशोक भाटकर आणि आयु. वासनिक यांनी सम्राट अशोक राजा यांच्या ज्वलंत इतिहास उपस्थितांसमोर उभा केला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा (मीराताई आंबेडकर प्रणित) रत्नागिरी तालुका अध्यक्ष आयु. सुनील पवार, उपाध्यक्ष आयु. राजेंद्र पवार (संरक्षक विभाग), उपाध्यक्ष आयु. राहुल पवार (प्रचार व पर्यटन बिभाग), सचिव आयु. सिद्धार्थ जाधव, सचिव आयु. आदेश कांबळे, सचिव आयु. प्रमोद जाधव, संघटक आयु. वासानिक यांनी परिश्रम घेतले. आयु. एल. व्ही. पवार, आयु. राजन जाधव, आयु. रूपेश कांबळे, आयु. संजय कांबळे, आयु. अशोक भाटकर, आयु. अशोक पवार,आयु. सिद्धार्थ कांबळे, आयु. केतन पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. आयोजकांच्या वतीने उपस्थितांचे आभार मानन्यात आले.




