रत्नागिरीत ’ब्रँडेड’ पेट्रोल महागले


आखाती देशांमध्ये भडकलेल्या युद्धाच्या ठिणगीचा परिणाम आता थेट स्थानिक बाजारपेठेवर जाणवू लागला आहे. जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन कंपन्यांनी सावध पवित्रा घेतला असून याचा पहिला फटका ’ब्रँडेड’ पेट्रोलला बसला आहे. जिल्ह्यात एचपीसीएल, बीपीसीएल आणि इंडियन ऑईल या प्रमुख कंपन्यांनी त्यांच्या प्रीमियम किंवा ’पॉवर’ पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २ रुपये ९ पैशांची वाढ केली आहे. पॉवर पेट्रोलच्या किंमती वाढल्या असल्या तरी दिलासादायक बाब म्हणजे, ’साध्या’ पेट्रोलच्या दरात सध्या कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे दुचाकीस्वार आणि मध्यमवर्गीय वाहनधारकांना तूर्तास मोठा दिलासा मिळाला आहे. युद्धाच्या सावटाखाली केवळ प्रीमियम इंधनावरच ही दरवाढ मर्यादित ठेवण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आखाती देशांमधील तणाव वाढल्याने कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी ब्रँडेड पेट्रोलचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरीत कालपर्यंत ११३.११ रुपये प्रतिलिटर दराने मिळणारे पॉवर पेटोल आज थेट ११५.२० रुपयांवर पोहोचले आहे. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागली आहे. युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता निर्माण झाली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button