रत्नागिरीतील संपर्क युनिक फाउंडेशनला मिळाला स्वच्छता चॅम्पियन पुरस्कार

रत्नागिरी : नगर पालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत रत्नागिरी शहर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी स्वच्छतेविषयी जनजागृती, सामाजिक सहभाग व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीने संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी ला सन २०२६ चा स्वच्छता चॅम्पियन पुरस्कार देण्यात आला.यावेळी नगराध्यक्ष सौ शिल्पा सुर्वे, आरोग्य सभापती बाबा नागवेकर, मुख्याधिकारी वैभव गारवे तसेच सर्व नगरसेवक, शहरातील विविध शाळा, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चा पुरस्कार अध्यक्ष शकील गवाणकर, युसुफ शिरगावकर,नाझीम मजगावकर, निलेश नार्वेकर, शाहनवाज बुड्ये यांनी स्वीकारला. सन २०२३ मध्ये ही रत्नागिरी नगरपालिकेच्या वतीने संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीला स्वच्छता चॅम्पियन पुरस्कार मिळाला होता.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर अध्यक्ष शकील गवाणकर यांनी सांगितले की, केवळ घाण, कचरा सफाई म्हणजे स्वच्छता नाही तर त्याच बरोबर आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही युवकांना व्यसनापासून परावृत्त करून त्यांना सामाजिक कार्यात आणण्यासाठी उपक्रम सुरू केले. यामध्ये आज अखेर सुमारे ७५ विद्यार्थ्यांना आठ दिवसांचे सामाजिक कार्य प्रशिक्षण दिले, रस्त्यावर भटकणारे आणि नागरिकांना नाहक त्रास देणारे मानसिक रुग्ण यांना ताब्यात घेवून त्यांना प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात येत आहे, शिवाय रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात अहोरात्र विनामूल्य सेवा रुग्ण मदत केंद्र येथून गेली आठ वर्षे सुरू आहे,या पुरस्काराने आमची जबाबदारी ही वाढली आहे, संस्थेच्या वतीने रत्नागिरी नगरपालिकेचे आभार मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button