
रत्नागिरीच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा
रत्नागिरी : येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य डॉ. चं. य. सिमिकेरी यांनी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
या प्रसंगी शास्त्र विभागाचे अधिव्याख्याता श्री विरेंद्रकुमार वायकोस यांनी मराठी भाषा गौरव दिन का साजरा करायचा याचे महत्व सांगताना कुसुमाग्रज यांच्या मराठी साहित्यातील योगदानावर प्रकाश टाकला. त्यांनी आपल्या भाषणात खास शैलीत विविध मराठी कवींच्या कविता सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या प्रसंगी संस्थेतील प्रा. भूषण कुलकर्णी , प्रा. श्रीकृष्ण सुतवणे अणि प्रा. उंबरीकर सर यांनी आपापल्या खास शैलीत स्वरचित आणि विविध प्रसिद्ध मराठी कविता सादर करत उपस्थितांची मने जिंकली. अतिशय जल्लोषात अणि उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास संस्थेतील विविध विभागाचे विभागप्रमुख ,अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिमखाना पदाधिकारी तसेच विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.




