युवासेनेतर्फे बसणी येथे सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

रत्नागिरी : बसणी येथे युवासेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचा युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सिंधुरत्न परीक्षेत बसणी जिल्हा परिषद मराठी शाळेचा १०० टक्के निकाल लागल्यामुळे युवासेना स्थानिक प्रतिनिधि आराध्य महेश नेवरेकर यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका वेदिका वैद्य व शिक्षिका वर्षा घाग यांचे विशेष अभिनंदन केले. ग्रामीण भागातल्या शाळेमधील विद्यार्थ्यांच्या यशामध्ये त्यांचे पालक व शिक्षक यांचा मोलाचा वाटत असतो आणि राज्यस्तरावर घेण्यात येणाऱ्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत गुणवत्ता यादीत यश मिळवणे ही खरंच कौतुकास्पद गोष्ट असल्याचे युवासेना जिल्हाप्रमुख श्री. सावंत यांनी सांगितले.
यावेळी सानवी सचिन गावडे, गौरी सचिन नेवरेकर, वरद वैभव रावणंग, आराध्य मंदार झगडे, दुर्वा सुमित राणे, शिवम अभिजीत झगडे, आर्यन विजय मोहिते, सृष्टी संतोष चव्हाण व इतर सर्व विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक मोहन (दादा) धांगडे, उपविभाग प्रमुख अमित धांगडे, उपसरपंच किशोर नेवरेकर, शाखाप्रमुख महेश नेवरेकर, कार्यालय प्रमुख संतोष नेवरेकर, गटप्रमुख अमेय मांडवकर, वैभव रावणंग व इतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button