
मेर्वी येथे श्री स्वामी समर्थ प्रगट दिन भक्तीमय वातावरणात संपन्न
गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वीतील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ प्रगट दिन भक्तीमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला.
आज (२० मार्च) भक्तांनी मठात मोठ्या संख्येने उपस्थित स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. सकाळी श्री स्वामी समर्थांची पूजा करण्यात आली. त्यानंतर स्वामी पादुकांवर अभिषेक झाल्यानंतर स्वामींची पालखी दुपारी प्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. आरती झाल्यानंतर दुपारी उपस्थित सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
आज दिवसभर आयोजित विविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेर्वी मठाचे पुजारी सहदेव पावसकर यांनी विशेष मेहनत घेतली.




