मुख्य जलवाहिनीवर बेकायदा पंप बसवून पाणीचोरी करणार्‍यांना राजापूर न.प.चे सभापतींकडून दणका


राजापूर शहरामध्ये मुख्य जलवाहिनीवर बेकायदेशीररीत्या पंप बसवून होणार्‍या पाणीचोरीच्या विरोधात राजापूर नगर पालिकेने आक्रमक पवित्रा घेत धडक कारवाई केली आहे. त्यामध्ये बेकायदेशीररीत्या बसविण्यात आलेले पाच पंप जप्त करण्यात आल्याची माहती पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे यांनी दिली. भविष्यामध्ये ही धडक कारवाई कायम सुरू ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
शहरामध्ये जलवाहिन्यांद्वारे करण्यात येणार्‍या पाणीपुरवठ्यामध्ये होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी पालिकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाणीचोरी करणार्‍यांवर थेट दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पाणीपुरवठा सभापती श्री. खडपे यांनी दिला होता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button